
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार , आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर विविध ठिकाणी झळकले आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
कल्याण : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले (Congress State President Nana Patole) हे उद्या एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीत येणार आहेत (Programme In Dombivali). नाना पाटोले यांच्या स्वागतासाठी कल्याण मधील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लावण्यात आलेल्या होर्डिंगमध्ये नाना पाटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख (Nana Patole is mentioned as the future Chief Minister) करण्यात आलाय.
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार , आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर विविध ठिकाणी झळकले आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठ आता कल्याणमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होवू लागल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावलेले बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरलेत.
महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले होते त्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे देखील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते.
या बॅनर्समुळे राजकीय गोटात विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली त्यातच नागपूरमध्ये आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले. त्यापाठोपाठ आता कल्याणमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर वर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने एकच राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.