वर्चस्वाची लढाई बेतली एका बिबट्याच्या जीवावर; तर दुसऱ्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबट विरुद्ध मानव संघर्ष सुरू आहे. त्यातच जंगलातील दोन बिबट्यांमधील अस्तित्वाच्या लढाईमध्ये एका बिबट्याने दुसऱ्या तीन वर्षीय नर बिबटला ठार केले. दुसऱ्या घटनेत, भिवकुंड नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याला धडक दिल्यानंतर वाहनचालक पसार झाला आहे. वन खाते वाहनाचा शोध घेत आहे.

    नागपूर – चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात दोन बिबट्यांचा (Leopard) मृत्यू झाला आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कन्हाळगाव येथे दोन बिबट्यांमधील वर्चस्वाची लढाई (War) तीन वर्षीय नर बिबट्याच्या जीवावर बेतली आहे; तर चंद्रपूर–बल्लारपूर मार्गावर भिवकुंड नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला.

    ताडोबा-अंधारी (Tadoba-Andhari) व्याघ्रप्रकल्पालगतच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबट विरुद्ध मानव संघर्ष सुरू आहे. त्यातच जंगलातील दोन बिबट्यांमधील अस्तित्वाच्या लढाईमध्ये एका बिबट्याने दुसऱ्या तीन वर्षीय नर बिबटला ठार केले. दुसऱ्या घटनेत, भिवकुंड नाक्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत (Vehicle Accident) एका बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याला धडक दिल्यानंतर वाहनचालक पसार झाला आहे. वन खाते वाहनाचा शोध घेत आहे.

    अपघाताची घटना रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. अपघाताच्या वेळी रस्त्यावर अंधार होता. वन अधिकाऱ्यांना माहिती मिळताच संपूर्ण पथक घटनास्थळी पोहचले. बिबट्याचा मृतदेह रस्त्यावर पडून असल्यामुळे वाहतूक काही काळासाठी खोळंबली.