आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाजाला मिळावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धरतीवर लिंगायत समाजालाहि किमान पाच हजार कोटी रुपय निधीची तरतूद करावी. आणि त्याची अंमलबजावणी करावी. जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाज्याला मिळावा. याबाबत तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू. असा इशारा लिंगायत समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

    कागल: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धरतीवर लिंगायत समाजालाहि किमान पाच हजार कोटी रुपय निधीची तरतूद करावी. आणि त्याची अंमलबजावणी करावी. जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाज्याला मिळावा. याबाबत तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू. असा इशारा लिंगायत समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, लिंगायत समाजात ७७० जाती असून बऱ्याच जातींना महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घेता येतो. पण शासन निर्णयानुसार लिंगायत धर्मातील खुल्या प्रवर्गाला आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळत नाही. हा लाभ लिंगायत खुल्या प्रवर्गाला मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णयात योग्य तो तात्काळ बदल करावा. जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळासाठी तरतूद केलेला पन्नास कोटीचा निधी अत्यल्प आहे.राज्यामध्ये एक कोटीच्यावर लिंगायत समाजाची लोकसंख्या आहे.या महामंडळाकरिता, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा प्रमाणे पाच हजार कोटी रुपयाच कर्ज वाटप करून, पाचशे पन्नास कोटी रुपयाचे व्याज परतावा करण्यात आला. त्याच धरतीवर लिंगायत समाजालाहि किमान पाच हजार कोटी रुपये निधीची तरतूद करावी. आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करावी.

    २९ जानेवारी २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई इथे झालेल्या महामोर्चामध्ये शासनाला निवेदन देण्यात आले होते, त्यानुसार महामंडळ स्थापन केले. पण त्यावेळी लिंगायत खुल्या वर्गाला डावलून महामंडळाची स्थापना झाली आहे.गोर गरीब गरजवंत खुल्या लिंगायत प्रवर्गाला या महामंडळाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. आमच्या मागणीबाबत योग्य तो निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी.अन्यथा येणाऱ्या २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.

    निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी राहुल रेखावार पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आमदार ऋतुराज पाटील यांना देण्यात आले.मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले या संधर्भात शासन निर्णयात बदल करून महिन्याभरात सरसकट लिंगायत समाजाला महामंडळाचा लाभ मिळेल. अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राजशेखर तांबके ,मनोज रणदिवे , संजय चितारी , महाजन सर माणगाव, मुगोलखोड माणगाव, अजित कोरे, सुरेश पाटील, आण्णासो कागले, अमित खोत ,तारदाल, प्रसन्न परीट, राजगोंडा पाटील, यादव, स्वप्नील माळी, दत्ता कुंभार यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.