Jitendra Awhad
Jitendra Awhad

मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यातच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडून तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तसेच शरद पवार यांना केंद्रीयमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार शरद पवार भेटीवर म्हटलं की, वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावर मी स्पष्टीकरण देणं हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे. पवार साहेबांची उंची किती, त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती? त्यांना कोण ऑफर देणार? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
    जे कोणी काय बोलतात ते बोलू द्या.
    जिंतेद्र वाहिद पुढे म्हणाले,  जे कोणी काय बोलतात ते बोलू द्या. पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आहे की, मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हातमिळवणी करणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार आहे, असे त्यांनी म्हटल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.दरम्यान राष्ट्रवादीच्या मागेपुढे संभ्रम निर्माण करायचा आहे, हाच एक उद्देश आहे. शरद पवार यांच्या विचारधारेत फरक पडलेला नाही. ते पुरोगामी विचार घेऊनच चाललेत यापुढे पुरोगामी विचार घेऊनच चालतील, असा दावाही आव्हाड यांनी केला.