जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीची हत्या, कारण अस्पष्ट

पालघरच्या जव्हार इथं राहणाऱ्या अफसानाला तीन मुलं आहेत. यापैकी तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह घराजवळील परिसरात आढळला होता. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असताना पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली

    पालघर : जन्मदात्या आईने आपल्या तीन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधे उघडकीस आली आहे. अफसाना उर्फ तारा सुलेमानी असं या आरोपी आईचं नाव आहे. पोलिसांनी तीला ताब्यात घेतलं असून तिनंच तिच्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

    पालघरच्या जव्हार इथं राहणाऱ्या अफसानाला तीन मुलं आहेत. यापैकी तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह घराजवळील परिसरात आढळला होता. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असताना पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या दिशेनं तपास सुरू असताना आरोपी आई सानाची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तिनेच आपल्या मुलीला मारल्याची बाब कबुल केली आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही आहे. मात्र, आर्थिक चणचणीला कंटाळून तिने तीन वर्षीय सानाची हत्या केल्याचा अंदाज पालघर पोलिसांना आहे.