हत्यारासह आणखी एका नक्षल्याचा मृतदेह आढळला; मृत नक्षल्यांची संख्या २७

नक्षल विरोधी अभियान राबवित असताना धबा धरून बसलेले नक्षल पोलिसांच्या दिशेने अंधादून गोळीबार करीत होते त्याला प्रत्युत्तर म्हणून सी-६० जवान देखील गोळीबाराला सुरुवात केली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलांनी जंगलाकडे पळ काढली नंतर शोध मोहीम राबवित सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडे सह २६ नक्षलांच्या मृतदेह आढळून आले होते.

  गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यातील गॅरापत्ती – कोटगुल जंगल परिसरात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सी ६० जवान आणि नक्षलांमध्ये चकमक उडाली होती यात सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडे सह २६ नक्षलांच्या खात्मा झाला असून सदर परिसरात शोध मोहीम राबवित असताना आज हत्यारासह एका पुरुष नक्षलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

  सविस्तर वृत्त असे कि १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सी-६० जवान गॅरापत्ती- कोटगुल जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना धबा धरून बसलेले नक्षल पोलिसांच्या दिशेने अंधादून गोळीबार करीत होते त्याला प्रत्युत्तर म्हणून सी-६० जवान देखील गोळीबाराला सुरुवात केली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलांनी जंगलाकडे पळ काढली नंतर शोध मोहीम राबवित सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडे सह २६ नक्षलांच्या मृतदेह आढळून आले होते.

  १६ नोव्हेंबर रोजी त्या परिसरात शोध मोहीम राबवित असताना हत्यारासह एका नक्षलाचा मृतदेह आढळून आला असून त्याची ओळख पटली आहे. सुखलाल परचाकी वय ३३ असे त्याचे नाव असून डीव्हीसि मेंबर आहे. सदर घटनास्थळी अजूनही शोध मोहीम सुरूच असून आणखी नक्षल्यांच्या मृतदेह सापडण्याची शक्यता आहे.

  कोण आहे सुखलाल उर्फ रामसाय?
  सुखलाल ऊर्फ रामसाय बिसराम परचाकी वय ३३, मु-कोसमी नं.१ ( पोमके सावरगाव अंतर्गत ) ता- धानोरा

  पद : डिकेएसझेडसीएम सन २००४ ते २०११ पर्यंत टिपागड दलम सदस्य
  सन २०१२ ते २०१३ कमांडर विस्तार प्लाटुन सी , ( तांडा , दर्रेकसा कमिटी )
  सन २०१४ ते २०१५ कंपनी नं . ४ प्लाटुन कमांडर
  सन २०१६ ते २०१७ चातगाव दलम कमांडर
  सन २०१८ ते २०१ ९ डिव्हीसीएम पदावर पदोन्नती ( अॅक्शन कमांडर )
  सन २०१ ९ मध्ये कोरची दलम इंन्चार्ज
  सन २०२१ मध्ये डिकेएसझेडसीएम पदावर पदोन्नती