घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला पोलीसाच्या पत्नीचा आढळला मृतदेह!

निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेलार यांच्या घराचा दरवाजा उघडला. यावेळी घरात शेलार यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

    मुंबई : वांद्रे (Bandra))परिसरातील घरातून एका ५८ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली शेलार असं या महिलेचं नाव असून ती निवृत्त पोलीस निरीक्षकाची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    वांद्रयातील निर्मलनगरमध्ये ही घटना घडली आहे. येथील साई कृपा इमारतीमध्ये राहणाऱ्या वैशाली शेलार यांच्या संध्याकाळी घरातून उग्र वास येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेलार यांच्या घराचा दरवाजा उघडला. यावेळी घरात शेलार यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. वैशाली शेलार या घरात एकट्याच राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. तसेच त्यांनी प्रकृतीही बरी नव्हती आणि त्या काही आजारांनी ग्रस्त होत्या. अशीही माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत असून शविच्छेदन अहवाल आल्यावर त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे.