मुंबई उच्च न्यायालयाने सदा सरवणकर यांची अंतरिम याचिका फेटाळली

आज मुंबई हायकोर्टानं (Bombay high court) सदा सरवणकर (Sada sarvankar) यांची अंतरिम याचिका फेटाळली आहे, शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने शिंदे गटाकडून आलेली अंतरिम याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळं हा शिंदे गटाला धक्का मानला जात आहे.

    मुंबई : शिंदे गटानं (Shinde group) केलेल्या बंडामुळं शिवसेनेत (Shivsena) फुटी पडली. परिणामी राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट (Thackeray and shinde) अशी शिवसेनेची विभागणी झाली. दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेनेना (Shivsena) आणि त्यानंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली होती. मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात (Bombay high court) सुनावणी पार पडली.

    दरम्यान, आज मुंबई हायकोर्टानं (Bombay high court) सदा सरवणकर (Sada sarvankar) यांची अंतरिम याचिका फेटाळली आहे, शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने शिंदे गटाकडून आलेली अंतरिम याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळं हा शिंदे गटाला धक्का मानला जात आहे. शिंदे गट व सरवणकरांची हस्तक्षेप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.