MP Supriya Sule honored

इंदापूर व बारामतीचे ऋणानुबंध जुने असून हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी या बारामतीच्या आहेत. त्यामुळे इंदापूर आणि बारामतीचे नेहमीच नाते हे जिव्हाळ्याचे राहिले असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले.

  इंदापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : इंदापूर व बारामतीचे ऋणानुबंध जुने असून हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी या बारामतीच्या आहेत. त्यामुळे इंदापूर आणि बारामतीचे नेहमीच नाते हे जिव्हाळ्याचे राहिले असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले. त्या गुरुवारी (दि.२३) इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.

  जि.प माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,तालुकाध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील,तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ,अशोक घोगरे,अमोल भिसे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,जिल्हा युवकध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

  यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे,सुभाष टिळेकर,रेश्मा शेख,विकास खिलारे,युवक अध्यक्ष गणेश धांडोरे, शहराध्यक्ष ॲड. इनायतअली काझी, ॲड. आशुतोष भोसले,समद सय्यद,अनिल ढावरे,अशोक चोरमले,श्रीकांत मखरे,अरबाज शेख,अक्षय कोकाटे,गफूर सय्यद यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक दादासो थोरात यांनी केले.

  पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, पाटीलवर पवार कुटुंबाचे पाच दशकांचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते कालही होते आजही आहेत. शंकरराव भाऊ आणि पवार साहेबांचे ऋणानुबंध होते. हर्षवर्धन भाऊ आणि पवार साहेब यांचे ऋणानुबंध आहेत. हा प्रेमाचा वारसा जपण्याचा प्रयत्न माझ्याकडून शंभर टक्के होईल. मदत, प्रेम, आशीर्वाद मोठा भाऊ म्हणून मी आयुष्यभर विसरणार नाही.

  ते भाजपामध्ये असले तरी आमचे भाजपामधील अनेक लोकांशी संबंध आहेत. आमची लढाई राजकीय आहे, वैयक्तिक कोणाशीही नाही. सर्व पक्षांमध्ये कौटुंबिक संबंध कालही होते, पुढेही राहतील. परंतु, राजकीय व वैचारिक मतभेद कायम राहतील, असे खासदार सुळे म्हणाल्या.

  हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील

  हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. त्यांनी जे तीन कायदे केले होते तेही शेतकऱ्यांच्या विरोधातील होते. केंद्र सरकारला पहिला यु टर्न या देशाच्या काळ्या मातीशी इमान असणाऱ्या शेतकऱ्यांनी घेण्यास भाग पाडले. सध्या शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर कोणीही सुखी नाही. प्रसार माध्यमांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या ५० बातम्यांपैकी ४५ बातम्या आंदोलनाच्या असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.