The boy was finally arrested in the father's murder case, the body was found in a water tank in the house

११ जून रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हर्षराज कॉलनीतील रहिवासी पद्माकर राऊत यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

    अमरावती : गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हर्षराज कॉलनीत ११ जून रोजी पद्माकर श्रीधर राऊत (५४) यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी चौकशीअंती संशयीत आरोपी मृताचा मुलगा गौरव पद्माकर राऊत (२२, रा. हर्षराज कॉलनी) याच्याविरुध्द २१ जून रोजी हत्येचा गुन्हा नोंदवून, त्याला अटक केली आहे.

    दहा दिवसानंतर गुन्हा दाखल

    ११ जून रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हर्षराज कॉलनीतील रहिवासी पद्माकर राऊत यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल व मृताची पत्नी मंदा (४७) यांच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

    बापलेक दोघेही प्याले सोबत दारू

    या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी गौरव याची उलट तपासणी देखील केली होती. त्यानंतरच्या काळात मृतक पद्माकर यांच्या पत्नी मंदा यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्या घटनेच्या कालावधीत आपला मुलगा गौरव हा त्याचे वडील पद्माकर यांच्यासोबत घरातच होता. ते सोबत दारू देखील प्याले. त्या दरम्यान, आपल्या पतीचा खून हा गौरवने किंवा अज्ञात व्यक्तीने केला असावा, असा संशय मंदा यांनी व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी संशयित म्हणून गौरव राऊत याला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.