आई वडिलांच कृत्य, पोटच्या मुलाला तब्बल २२ हून अधिक श्वानासोबत एका रूममध्ये डांबून ठेवले आणि…

पुण्यातील कोंढवा भागात राहणार्‍या आई वडीलांनी ११ वर्षाच्या पोटच्या मुलाला तब्बल २२ हून अधिक श्वानासोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना घडली आहे.

    पुणे – पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा भागात राहणार्‍या आई वडीलांनी ११ वर्षाच्या पोटच्या मुलाला तब्बल २२ हून अधिक श्वानासोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आई वडीलाविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम सन २००० चे कलम २३, २८ प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये ९ तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लोधरिया वडील आणि शितल लोधरिया आई असे आरोपी आई वडीलांची नावे आहेत.

    तक्रारदार अपर्णा मोडक यांनी याबाबत आमच्याकडे याबाबत तक्रार देताच, कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी श्वान असलेल्या रुममध्ये तो मुलगा आढळून आला. त्यानुसार आरोपी वडील संजय लोधरिया आणि आरोपी आई शितल लोधरिया यांच्या विरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम सन २००० चे कलम २३, २८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी वडील आणि आई या दोघांकडे चौकशी सुरू आहे. तर मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसानी सांगितले.