प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

लोणंद येथील शेतकऱ्याच्या शेतीला वीज जोडणी देणेसाठी १२ हजाराची लाच स्विकारणाऱ्या वाठार कॉलनीचा महावितरणचा कनिष्ठ अभियंता शरद ओकेश्वर ओंकार (मुळ राहणार वर्धा सद्या राहणार लोणंद ता. खंडाळा )याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाच घेताना रंगेहाथ पकडले.

    लोणंद : लोणंद येथील शेतकऱ्याच्या शेतीला वीज जोडणी देणेसाठी १२ हजाराची लाच स्विकारणाऱ्या वाठार कॉलनीचा महावितरणचा कनिष्ठ अभियंता शरद ओकेश्वर ओंकार (मुळ राहणार वर्धा सद्या राहणार लोणंद ता. खंडाळा )याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाच घेताना रंगेहाथ पकडले.
    मिळालेल्या माहितीनुसार,  लोणंद येथील एका शेतकऱ्याने शेतीला वीज जोडणीसाठी मागणी ओंकार यांचेकडे केली होती. ती विज जोडणी करणेसाठी संबधीत शेतकऱ्याकडे २० हजार रुपायाची मागणी ओंकार यांनी केली होती. त्यानंतर त्या शेतकरयाने सातारा एसीबीकडे वरील अभियंत्यासंदर्भी तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता ओंकार हे तडजोडीनंतर १२ हजाराची लाच मागणी करत असल्याचे निष्पळ झाल्यावर एसीबीने सापळा लावला होता. त्यांनंतर शेतकरयाकडून बारा हजाराची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहात पकडले. हि कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सचिन राऊत हवालदार विनोद राजे, संभाजी काटकर, मारुती अडागळे यांनी केली आहे.