The building of Eilda Health Center is still vacant waiting for the dedication

दरम्यान या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी रात्री अपरात्री रुग्णांना घेऊन जाण्याकरिता १८ ते २० किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळे,  त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्याही पलीकडे राजोली परिसरातील तिरखुरी, बोरटोला, नागनडोह, बलिटोला, भरणोली, खडकी यासारख्या अति दुर्गम गावात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहेत.

    अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील इळदावासी (Ildavasi) व परिसरातील लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत (Primary Health Center Building) बनविण्यात आली.  इमारत आरोग्य सुविधा पुरविण्यास सज्ज आहे. मात्र लोकार्पणाचा अजूनही मुहूर्त निघाला नाही. लोकार्पणाची प्रतीक्षा असतानाच आता इमारतीची केलेली रंगरंगोटी देखील उडाली आहे. अजूनही काही साहित्य चोरीला गेल्यावर संबंधिताना जाग येईल काय ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

    तालुक्यातील केशोरीपासून ४० ते ४५ किलोमीटर अंतरावरील गावामध्ये आदिवासी समाजबांधवांची (Tribal community members) संख्या अधिक आहे. त्यामुळे या आदिवासी समाजबांधवांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता ईडदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र हवे, अशी सगळ्यांची इच्छा होती. तसे झाले देखील. २०१६ मध्ये मोठ्या थाटामाटात इमारत बांधकामाचे भूमिपूजन झाले. इमारतीच्या बांधकामाला देखील जोमात सुरुवात करण्यात आली व दिमागदार इमारत तयार झाली. या इमारतीतून रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी इमारत डौलाने उभी आहे.

    मात्र अजूनही या इमारतीचे लोकार्पण झाले नाही. परिणामी तयार झालेल्या इमारतीची रंगरंगोटी उडायला लागली आहे. यावरून बांधकाम कसे असावे याचाही प्रत्यय येतो. सध्या इळदावासी व परिसरातील लोकांकरिता आरोग्यसेवा डोकेदुखीची ठरली आहे. त्याही पलीकडे राजोली परिसरातील तिरखुरी, बोरटोला, नागनडोह, बलिटोला, भरणोली, खडकी यासारख्या अति दुर्गम गावात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहेत.

    दरम्यान या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी रात्री अपरात्री रुग्णांना घेऊन जाण्याकरिता १८ ते २० किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळे,  त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर गंभीर आजारी रुग्ण वाटेतच मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या समस्येचा विचार करून इळदा येथील रुग्णालयाचे तातडीने लोकार्पण होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.