वाघोबा घाटात बस दरीत कोसळली ; १५ ते २० प्रवासी जखमी

पालघर वाघोबा घाटात एसटी महामंडळाच्या रातराणी बसला भीषण अपघात झाला भुसावळ ते बोईसर बस वीस ते पंचवीस फूट खोल दरीत कोसळली बस मधील १५ ते २० जण गंभीर जखमी झालेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही

    पालघर : पालघर वाघोबा घाटात एसटी महामंडळाच्या रातराणी बसला भीषण अपघात झाला भुसावळ ते बोईसर बस वीस ते पंचवीस फूट खोल दरीत कोसळली बस मधील १५ ते २० जण गंभीर जखमी झालेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमींवर पालघर येथील ग्रामीण रुग्णालय उपचार सुरु आहेत. बसचा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
    रातराणी या बस चा चालक नाशिक येथे बदलण्यात आला. या चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून भरधाव गाडी चालवणाराच्या नादात पालघर पूर्वी वाघोबा घाटात बस दरीमध्ये सकाळी ६: १५ वाजल्याच्या सुमारास उलटली.
    भुसावळ बोईसर रात राणी एसटी बस वाघोबा घाटात आली असता चालकाचे नियंत्रण सुटले व बस २० ते २५ फूट खोल दरी मध्ये कोसळली दरम्यान त्याआधी नाशिक मध्ये या बसचा चालक बदलण्यात आला होता बदलण्यात आलेल्या चालकांने दारूचे सेवन केले असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता याबाबत कंडक्टर कडे तक्रार ही करण्यात आली  प्रवाशांच्या तक्रारी कडे त्याने दुर्लक्ष केले असल्याचेही प्रवश्यानी म्हटले आहे.
    या अपघातामध्ये किमान पंधरा ते वीस  प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.