The cannibal tiger took another victim! In just 4 days, two tiger hunters, wildlife-human conflict reached Shige

मागील काही महिन्यांपासून वडसा वनविभागातील आरमोरी तालुक्यातील जंगल परिसरात सीटी-१ नामक नरभीक्षी वाघाने दहशत माजविली आहे. रविवारी पोर्ला येथील जंगल परिसरात सदर वाघाने एका युवकाला ठार केले होते. या घटनेनंतर वनविभागाद्वारे ताडोबा येथून वाघाला बेशूद्ध करण्यासाठी विशेष वैद्यकीय पथक वडसा वनविभागात दाखल झाले आहे.

  गडचिरोली : वडसा वनविभागांतर्गत (Under Wadsa Forest Department) येत असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात वाघाने माजविलेल्या दहशतीमुळे (terror of the tiger) या परिसरातील गावातील नागरिकांची बोबळी वळली आहे. रविवारी पोर्ला येथे एका युवकास वाघाने ठार केले होते, ही घटना ताजी असतांनाच २९ जून रोजी पोर्ला वनपरिक्षेत्रातील बोरी चक ( Bori Chak ) येथील जंगलात वाघाने एका शेतक-याच्या नरडीचा घोट घेतला (The tiger bit a farmer’s nerd ) अवघ्या चार दिवसाच्या कालावधीत वाघाने दोघांची शिकार केल्याने या भागात वन्यजीव – मानव संघर्ष अधिकच शिगेला पोहचला असल्याचे दिसून येत आहे.

  प्राप्त माहितीनुसार, पोर्ला वनपरिक्षेत्र (Porla Forest Reserve) अंतर्गत येत असलेल्या आरमोरी तालुक्यातील बोरी चक (Bori Chuck in Armory taluka) येथील शेतकरी सागर आबाजी वाघरे (Farmer Sagar Abaji Waghre) (४५) हे शेतीचा खरीप हंगाम सुरु असल्याने नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास जंगल परिसरालगत शेतावर गेले होते. दरम्यान झुडूपात दडी मारुन असलेल्या नरभक्षी वाघाने त्यांचेवर हल्ला चढवून ठार केले. या वनक्षेत्रात मागील चार दिवसाच्या कालावधीत एका युवकांसह शेतकरी असे दोघे वाघाचे बळी ठरल्याने या परिसरातील गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अद्यापही वनविभाग नरभक्षी वाघास जेरबंद करण्यात यशस्वी न झाल्याने वनविभागाप्रती नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

  शेतावर जाणे बितले जीवावर
  सद्यस्थितीत शेतीचा खरीप हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेग आले आहे. आरमोरी तालुक्यातील बोरी चक येथील सागर वाघरे हा शेतकरी शेत कामासाठी शेतावर गेला होता. वाघाने एकाएक त्याचेवर हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्राधिकारी राकेश मडावी यांचेसह वनकर्मचा-यांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. मृतदेव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

  शेतकरी भीतीने ग्रासलेले
  मागील काही दिवसांपासून आरमोरी तालुक्यात नरभक्षी वाघाने चांगलीच दहशत माजविली आहे. मागील पंधरवड्यात या क्षेत्रात वाघाने तिघांवर हल्ला चढवित ठार केले आहे. विशेषत: शेतकरी व शेतमजूर या वाघाचे बळी ठरले आहेत. सद्यस्थितीत खरीप हंगाम सुरु असल्याने शेतावर जाणे शेतक-यांन गरजेचे झाले आहे. मात्र या शेती हंगामातच वन्यजीव-मानव संघर्ष सातत्याने वाढत असल्याने शेतीची कामे कशी करायची, या भीतीने शेतक-यांना ग्रासले आहे.

  पथक सीटी- १ वाघाच्या मागावर
  मागील काही महिन्यांपासून वडसा वनविभागातील आरमोरी तालुक्यातील जंगल परिसरात सीटी-१ नामक नरभीक्षी वाघाने दहशत माजविली आहे. रविवारी पोर्ला येथील जंगल परिसरात सदर वाघाने एका युवकाला ठार केले होते. या घटनेनंतर वनविभागाद्वारे ताडोबा येथून वाघाला बेशूद्ध करण्यासाठी विशेष वैद्यकीय पथक वडसा वनविभागात दाखल झाले आहे. सदर पथक नरभक्षीला बेशूद्ध करण्यासाठी त्याचे मागावर आहे. मात्र अद्यापपर्यंत पथकाच्या पदरी निराशाच पडली आहे.