कारवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीपात्रात कोसळली; अपघातामध्ये पिता पुत्राचा मृत्यू

राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. असाच एक अपघात नागपूरमध्ये घडला आहे. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदी पात्रामध्ये जाऊन बुडाली.

    राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. असाच एक अपघात नागपूरमध्ये घडला आहे. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदी पात्रामध्ये जाऊन बुडाली. यामध्ये पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. ही घटना २६ एप्रिलला नागपूरमध्ये घडली. रात्री बारा वाजताच्या सुमारास नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील कळमेश्वर-गोंडखैरी मार्गावर हा भीषण अपघात घडला. रवींद्र भैय्याजी टाले (३३), भैय्याजी टाले या दोघांचा मृत्यू झाला असून राहुल डोमके हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

    कळमेश्वर शहरात रथयात्रा सुरु झाल्याने ती पाहण्यासाठी भैय्याजी टाले दुय्यम खडा तमाशा बघण्याकरिता गेले होते. त्यावेळी रात्री उशीर झाला तरी वडील घरी ना आल्याने त्यांचा मुलगा रवींद्र टाले हा त्याचा मित्र राहुल डोमके याला घेऊन हुंडाई कंपनीची वरणा कार (कार क्रमांक MH 43 AL9591) घेऊन कळमेश्वरला आले होते. त्यानंतर ते त्यांच्या वडिलांना घेऊन रात्री बारा वाजताच्या दरम्यान तोंडाखैरी गावाजवळ जात होते. या गावाजवळ जात असताना त्यांच्या गाडीचा ताबा सुटला आणि गाडी नदी पात्रता पडली. तसेच या अपघातामध्ये पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला राहुल डोमके हा गंभीर जखमी झाला आहे. राहुलने गाडीची काच फुटल्यानंतर पात्रालगत असलेली झाडावरची फांदी पकडून रात्रभर गंभीर जखमी अवस्थेमध्ये लटकून राहिला. त्यानंतर सकाळी गावातील फिरायला जाणाऱ्या लोकांना अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. तसेच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    अपघातामध्ये जखमी झालेल्या राहुल डोमकेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या अपघातामध्ये बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याने टाले कुटुंबियासह परिसरात शोककळा पसरली आहे. भर धाव वेगात असलेल्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. मात्र या अपघात सुदैवाने राहुल हा वाचला आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.