सिईओ यांनी दिला शेळकंदे यांना ध्वजारोहणाचा मान

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमात संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा न्हाऊन निघाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची हर घर तिरंगा संदेश रॅली काढण्यात आली होती. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमात संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा न्हाऊन निघाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची हर घर तिरंगा संदेश रॅली काढण्यात आली होती. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    रविवारी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची भव्य अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये सर्वच अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. हरीभाई प्रशाला, सरस्वती विद्यामंदिर यांच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली रॅली डफलीन चौक, हरीभाई देवकरण प्रशाले समोरून जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात विसर्जित झाली.

    रॅलीच्या दर्शनी भागात हरिभाई देवकरण प्रशालेच्या एनसीसीचे विद्यार्थी त्या पाठोपाठ सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थी त्यामागे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांचा रॅलीत सहभाग होता. शंभर मीटर तिरंगा झेंडा हा रॅलीचा आकर्षण ठरला.

    छत्रपती शिवाजी उद्यानात आल्यानंतर याााठिकाणी हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरमचा गगगनभेदी जयघोष करण्यात आला. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी या रॅलीला उस्फूर्त सहभाग मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानताना दुसऱ्या दिवशीही हर घर तिरंगा उपक्रमाचे नोडल अधिकारी इशादीन शेळकंदे यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला.

    शेळकंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्यास राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रमुख अधिकाऱ्यांनी लेझीमचा जोशपूर्ण खेळ सादर केला. या रॅलीत मुख्य लेखा वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा कृषी अधिकारी कुंभार, पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, उपशिक्षणाधिकारी जावीर, उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्रशासन अधिकारी अनिल जगताप,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, शिक्षक संघटनेचे शिवानंद भरले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.