राज्य सेवा परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करावी ; विद्यार्थी मित्रांनी घेतली खासदार उदयनराजे भोसले यांची भेट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच राजपत्रित अधिकारी वर्ग एक व दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल केला आहे एमपीएससी मार्फत घेतली जाणारी ही परीक्षा यूपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे

    सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच राजपत्रित अधिकारी वर्ग एक व दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल केला आहे एमपीएससी मार्फत घेतली जाणारी ही परीक्षा यूपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी २०२३ ऐवजी २०२५ पासून करावी या मागणीसाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आज जन्मदिन येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

    -परीक्षा पद्धतीत बदल ही काळाची गरज
    त्रिस्तरीय समितीने केलेल्या सूचनानुसार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांना स्वागतारह आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे स्वीकारला आहे, मात्र अचानक २०२३ पासूनच त्याचा स्वीकार करण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी आहे. अचानक परीक्षा पद्धतीमध्ये बदल झाल्यास वर्ग एक आणि दोनच्या अधिकारी होण्याच्या कामापासून बऱ्याच विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागेल परीक्षा पॅटर्न बदलण्याचा आयोगाचा निर्णय योग्य असला तरी या निर्णयाला सर्व विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे. परीक्षा पद्धतीत बदल ही काळाची गरज आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पॅटर्न प्रमाणे तयारी केली आहे त्यांच्या या तयारीचा विचार व्हावा त्यांना नव्या बदलासाठी थोडा वेळ हवा आहे त्यामुळेच हा बदल २०२५ पासून करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.