प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने मुख्यमंत्री २२ तारखेपासून सुरू असलेल्या अधिवेशनात अनुपस्थित

समारोपासाठी काही वेळ हजेरी लावतील त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी घेण्यात आली या बैठकीला मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणाली व्दारे उपस्थित राहिले मात्र आज ते विधिमंडळाच्या अधिवेशनात हजर राहू शकले नाहीत. आता शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री समारोपासाठी काही वेळ हजेरी लावतील अशी अपेक्षा अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने विधिमंडळाच्या २२ तारखेपासून सुरू असलेल्या अधिवेशनात उपस्थित राहू शकले नाहीत. सुरूवातीच्या तीन दिवसांत मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्री हजर राहतील याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात होती. मात्र राज्य सरकारच्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत राज्यपालांनी घटनात्मक पेच असल्याचे सांगत नियम बदलांना हरकत घेतल्याने निवडणुक घेण्याबाबत अनिश्चितीचे वातावरण निर्माण झाले.

    समारोपासाठी काही वेळ हजेरी लावतील त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी घेण्यात आली या बैठकीला मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणाली व्दारे उपस्थित राहिले मात्र आज ते विधिमंडळाच्या अधिवेशनात हजर राहू शकले नाहीत. आता शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री समारोपासाठी काही वेळ हजेरी लावतील अशी अपेक्षा अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

    दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात दररोज कोरोनाची चाचणी करणार केली जाणार आहे. सध्या कोविडची स्थिती असल्यानं आता आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंडळात कधी येणार यावर आदित्य ठाकरेंनी ठोस माहिती दिली नाही. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनात हजेरी लावण्यासंदर्भात निर्णय घेतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.