मुख्यमंत्र्यांना शिरुरमधून भुजबळांना उमेदवारी द्यायची होती; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिरुर लोकसभा मतदार संघातून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची होती. पण, भुजबळांनी नकार दिल्याने ती उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्यात आल्याचा गौप्यस्फोट खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.

    पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिरुर लोकसभा मतदार संघातून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची होती. पण, भुजबळांनी नकार दिल्याने ती उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्यात आल्याचा गौप्यस्फोट खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलच उधाण आले आहे.

    महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहराध्यक्ष तुषार कामठे, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.

    या मेळाव्यात डॉ. कोल्हे म्हणाले, समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती. शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. भुजबळांनी नकार दिल्यानेही उमेदवारी आढळरावांना देण्यात आली.