…अन् ‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर करत लहानग्यांनी शाळेतच अनुभवला वारी सोहळा

शायनिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी 'ग्यानबा-तुकाराम'चा गजर करत वारीचा सोहळा शाळेतच अनुभवला. प्ले ग्रुप ते दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थी पारंपारिक वेषात या सोहळ्य़ात सामील झाले.

    पुणे : शायनिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर करत वारीचा (Ashadhi Ekadashi 2022) सोहळा शाळेतच अनुभवला. प्ले ग्रुप ते दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थी पारंपारिक वेषात या सोहळ्य़ात सामील झाले.

    ज्ञानोबा तसेच तुकाराम महाराजांच्या पायी पालखी वारी सोहळ्य़ास सुरुवात झाली असून, लाखो भाविक यात सहभागी झाले आहेत. वारीचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी व तो अनुभवण्यासाठी शायनिंग स्टार प्रायमरी स्कूलमध्ये लहानग्यांचा वारी सोहळा मुख्याध्यापिका पूनम वर्मा तसेच शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता.

    स्वत:च्या हाताने तयार केलेली व फुलांनी सजवलेली पालखी, विठ्ठल-रखुमाई बनलेली गोंडस बालके तसेच डोक्यावर तुळस व टाळ मृदंगाच्या लयीत तल्लीन झालेले पारंपरिक वेषातील बाल वारकऱ्यांनी हा वारी सोहळा जिवंत केला.