संजय पांडेंच्या कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट CBI कडून सादर, रिपोर्टमध्ये काय माहितेय?

संजय पांडे यांनी काही वर्षापूर्वी आयसेक सर्व्हिसेस नावाची कंपनी स्थापन केली होती, ज्या कंपनीला NSE को लोकेशन घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं होतं. सीबीआयनं याच प्रकरणात आता क्लोजर रिपोर्ट दाखल करत गुन्हा दाखल केला होता.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांच्या आयसेक कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. आयसेकनं ऑडिट केलेल्या 2 स्टॉकब्रोकर्सचं ऑडिट केलं होतं. मात्र त्यांना आता सीबीआयकडून (CBI) मोठा दिलासा मिळाला आहे. या केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं विशेष कोर्टासमोर सादर केला आहे. याची पुढची सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळं संजय पांडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. (the closure report of the case against sanjay pandey company submitted by cbi what is known in the report)

    काय आहे प्रकरण?

    दरम्यान, संजय पांडे यांनी काही वर्षापूर्वी आयसेक सर्व्हिसेस नावाची कंपनी स्थापन केली होती, ज्या कंपनीला NSE को लोकेशन घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं होतं. सीबीआयनं याच प्रकरणात आता क्लोजर रिपोर्ट दाखल करत गुन्हा दाखल केला होता. तसेच या प्रकरणी पांडेंना अटक देखील झाली होती. आयसेक कंपनीशी संबंधित प्रकरणात तपासादरम्यान पुरेसे पुरावे आढळले नसल्याचं सांगितलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना मोठा दिलासा मिळाला असून सीबीआयने त्यांच्याशी संबंधित कंपनीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.