The collaboration between LinkedIn and UN Women will create employment opportunities for women in APAC
प्रतिकात्मक फोटो

या प्रकल्‍पाला भारतातील महाराष्‍ट्रामधून सुरूवात होईल. हा प्रकल्‍प २,००० महिलांच्‍या डिजिटल, सॉफ्ट व रोजगारक्षम कौशल्‍यांना निपुण करेल आणि त्‍यांना रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे व पीअर-टू-पीअर नेटवर्क्‍सच्‍या माध्‍यमातून करिअर घडवण्‍याची संधी देईल.

  • भारतातील महाराष्‍ट्रात होणार उपक्रमाची सुरूवात
  • लिंक्‍डइन महिलांना डिजिटली अपस्किल करण्‍यासाठी जवळपास ४ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार
  • महिला अधिक रोजगारक्षम होणार

मुंबई : लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने (Business Network) आज घोषणा केली की, ते महिलांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करण्‍यासाठी लैंगिक समानतेशी समर्पित युनायटेड नेशन्‍स कंपनी यूएन विमेनसोबतच्‍या तीन वर्षाच्‍या प्रादेशिक सहयोगामध्‍ये ५००,००० डॉलर्सची (३.८८ कोटी रूपये) गुंतवणूक करणार आहे.

या प्रकल्‍पाला भारतातील महाराष्‍ट्रामधून सुरूवात होईल. हा प्रकल्‍प २,००० महिलांच्‍या डिजिटल, सॉफ्ट व रोजगारक्षम कौशल्‍यांना निपुण करेल आणि त्‍यांना रोजगार मेळावे, मार्गदर्शन सत्रे व पीअर-टू-पीअर नेटवर्क्‍सच्‍या माध्‍यमातून करिअर घडवण्‍याची संधी देईल. हा सहयोग महिलांना डिजिटली अपस्किल करण्‍यासोबत रोजगारांची अधिक उपलब्‍धता देईल आणि औपचारिक अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये पूर्णपणे सहभाग घेण्‍यास सक्षम करेल.

महिलांना असमान प्रमाणात इंटरनेटची मुलभूत उपलब्धता मिळते. आशिया-पॅसिफिक प्रदेशातील लैंगिक-संबंधित तंत्रज्ञान धोरणनिर्मितीचे निराकरण करणे हे आशियामध्‍ये महत्त्वाचे आहे. ५४.६ टक्‍के पुरूषांच्‍या तुलनेत ४१.३ टक्‍के महिलांना इंटरनेट उपलब्‍ध होते. यामधून ३२ टक्‍के लैंगिक पोकळी दिसून येते. इंटरनॅशनल टेलिकम्‍युनिकेशन्‍स युनियन (आयटीयू)च्‍या मते, २०१३ ते २०१७ दरम्‍यान आशियामधील लैंगिक पोकळी १७ टक्‍क्‍यांवरून २४ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली. महिला आणि मुलींना अनेकदा शिक्षण किंवा पुरूष व मुलांप्रमाणे शिक्षण मिळत नाही. कधी-कधी त्‍यांना कमी डिजिटल कौशल्‍ये, साक्षरता आणि परिणामत: वाढत्‍या डिजिटल युगामध्‍ये कमी आर्थिक संधी मिळतात. खरेतर, कोविड-१९ च्‍या विषम प्रभावामुळे गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये महिला व मुलींसाठी या संधीमधील पोकळीमध्‍ये वाढ झाली आहे.

या सहयोगासह लिंक्‍डइन व यूएन विमेन ही पोकळी भरून काढण्‍यासाठी एकत्र काम करेल. त्‍यांचा प्रदेश व जगाला कर्मचारीवर्गामध्‍ये सुधारित लैंगिक समानता संपादित करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे.

या सहयोगाला विमेन्‍स एम्‍पॉवरमेंट प्रिन्सिपल्‍स (डब्‍ल्‍यूईपी)चे मार्गदर्शन मिळेल. डब्‍ल्‍यूईपी हा प्रभावी, कृतीशील तत्त्वांचा संच आहे, जो व्‍यवसायांना कार्यस्‍थळी, बाजारपेठेत आणि समुदायामध्‍ये लैंगिक समानता व महिला सक्षमीकरणाला कशाप्रकारे चालना द्यावी याबाबत मार्गदर्शन करतो.

”अधिकाधिक व्‍यवसाय व व्‍यावसायिक लैंगिक समान कार्यस्‍थळांचे लाभदायी परिणाम ओळखू लागले असल्‍याने आम्‍हाला महिलांना आजच्‍या डिजिटल युगामध्‍ये अधिक रोजगारक्षम व उद्योजक बनण्‍यास मदत करण्‍याची अद्वितीय संधी मिळाली आहे. आम्‍हाला यूएन विमेनसोबत सहयोग करत महिलांचे अपस्किलिंग व आर्थिक सक्षमीकरणामध्‍ये गंतवणूक करण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रदेशाच्‍या कर्मचारीवर्गामध्‍ये महिला प्रतिनिधित्‍व व व्‍यावसायिक विविधता सुधारण्‍याप्रती सहयोगाने काम करण्‍याचा आनंद होत आहे. महिलांना योग्‍य कौशल्‍ये व संसाधने देत आम्‍ही अधिक समान व सर्वसमावेशक टॅलेण्‍ट क्षेत्र निर्माण करण्‍याची आशा करतो,” असे लिंक्‍डइनचे भारतातील कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्‍ता (Ashutosh Gupta, India Country Manager, LinkedIn) म्‍हणाले.

यूएन विमेन आणि लिंक्‍डइन सहयोगींना महिलांच्‍या आर्थिक सक्षमीकरणासह पाठिंबा देण्‍याचे आवाहन करण्‍यासाठी लिंक्‍डइन व्‍यासपीठ व संस्‍थात्‍मक कौशल्‍यांचा लाभ घेतील. सहयोगाने ते संयुक्‍त सल्‍लामसलत मोहिमा व इव्‍हेण्‍ट्स राबवतील, तसेच त्‍यांच्‍या संबंधित नेटवर्क्‍समधील प्रमुख सहयोगींना कार्यस्‍थळामध्‍ये पुरूष व महिलांसाठी व्‍यापक समान संधी व निष्‍पत्ती संपादित करण्‍याचे आवाहन करतील. तसेच यूएन विमेन त्‍यांच्‍या सहयोगांचा लाभ घेत तरूण महिलांना उद्योगांमध्‍ये सुलभ संधी देईल, जेथे त्यांचे लिंक्‍डइन व्‍यासपीठ ऑपरेट करण्‍यावर आणि कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.

”महिला व मुलींना उत्तम रोजगार व उद्योजक संधी मिळण्‍याकरिता दर्जेदार शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. लिंक्‍डइनसोबत सहयोगाने लिंक विमेन प्रकल्‍पाचा महिलांचा समूह तयार करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे महिला नवीन डिजिटल व रोजगारक्षम कौशल्‍ये आत्‍मसात करतील आणि त्‍यांना उत्तम रोजगार मिळतील,” असे यूएन विमेन इंडियाच्‍या देशातील प्रतिनिधी सुझान फर्ग्‍युसन म्‍हणाल्‍या.

हा उपक्रम सुरू केल्‍याच्‍या १५-महिन्‍यांनंतर यूएन विमेन व लिंक्‍डइन आवश्‍यक असल्‍यास उपक्रमांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी अवलत केलेले धडे व मूल्‍यांकनात्‍मक अभिप्रायाचा समावेश करतील आणि त्‍यानंतर इतर आशिया-पॅसिफिक देशांमध्‍ये विस्‍तार करतील.

भारतातील पायलट प्रकल्‍पाबाबत:

यूएन विमेनच्‍या सेकंड चान्‍स एज्‍यकेशन ॲण्‍ड व्‍होकेशनल लर्निंग उपक्रमांतर्गत लिंक विमेन प्रोजेक्‍ट असेल. या प्रकल्‍पाचा गरिबी व लिंग-आधारित भेदभावामुळे वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळात संधी न मिळालेल्‍या सर्वात वंचित महिलांना सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम अध्‍ययन, रोजगार व उद्योजक या मार्गाचा वापर करत सक्षमीकरणाप्रती सर्वांगीण दृष्टीकोन राखतो.

अंमलबजावणी कालावधी: जुलै २०२२ – ऑक्‍टोबर २०२३

स्‍थळे: महाराष्‍ट्रातील मुंबई, बृहन्‍मुंबई व पुणे प्रांत

लाभार्थी: उच्‍च शिक्षण पूर्ण केलेल्‍या आणि डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये लाभदायी सहभाग घेण्‍यास सुसज्‍ज असलेल्‍या महिला.

यशाचे मुख्‍य मार्ग:

अधिक रोजगारक्षमता व स्‍वयं-रोजगारासाठी कौशल्‍ये देणे, डिजिटल कौशल्‍यांवर लक्ष केंद्रित करणे.

ई-प्‍लॅटफॉर्म्‍स व उद्योग भेटींच्‍या माध्‍यमातून उद्योग व सहकाऱ्यांशी कनेक्‍शन जोडणे.