Transmission of fraudulent message regarding electricity bill, complaint to police by MSEDCL

महावितरणने वीज दरवाढीची केलेली मागणी ही सरासरी ३७ टक्के म्हणजे २.५५ रुपये प्रति युनिट याप्रमाणे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे होते. ही खूप मोठी दरवाढ असून सामान्य जनतेला अजिबात परवडणारी नसल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले. ही दरवाढ शुक्रवारपासून होणार असल्याचं बोललं जातंय.

मुंबई– सामान्य लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशासह राज्यात सध्या कमालीची महागाई (inflation) वाढली आहे. लोकांना खायचे काय…आणि जगायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा महागाईची झळ लोकांना बसणार आहे. महागाईनं त्रस्त सामान्य लोकांना पुन्हा एकदा महावितरणकडून (MSCB) ‘शॉक’ बसणार आहे. शुक्रवारी वीज दरवाढ (Power rate) होणार असल्याची माहिती समोर येत आहे, प्रतियुनिट (Unit) अडीच रुपये दरवाढीची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे, त्यामुळं महागाईला कंटाळलेल्या, आणि महागाईमुळं मेटाकुटीला आलेल्या लोकांमध्ये या वीजदरवाढीमुळं संतापाची लाट आहे. वीजदरवाढ करुन महावितरण आणखी एक शॉक आणि धक्का देणार आहे.

प्रतियुनिट अडीच रुपये दरवाढीची शक्यता

महावितरणने ६७ हजार ६४४ कोटी रुपये तुटीची भरपाई करण्यासाठी वीज दरवाढ करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आयोगाकडे केला होता. त्यावर १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात ग्राहकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आयोगाने विभागानुसार जनसुनावणी घेतली. एकूण १४७ हरकती प्राप्त झाल्या. महावितरणने वीज दरवाढीची केलेली मागणी ही सरासरी ३७ टक्के म्हणजे २.५५ रुपये प्रति युनिट याप्रमाणे असल्याचे ग्राहकांचे म्हणणे होते. ही खूप मोठी दरवाढ असून सामान्य जनतेला अजिबात परवडणारी नसल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले. ही दरवाढ शुक्रवारपासून होणार असल्याचं बोललं जातंय. लोकांमध्ये या वीजदरवाढीमुळं संतापाची लाट आहे.

वीज दरवाढ विरोधात व्यावसायिकांचे आंदोलन

दरम्यान, या वीजदरवाढीला सर्व स्तरातून विरोध होत आहे, याला राज्यातील व्यावसायिक विरोध म्हणून मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये इतरही औद्योगिक संघटना सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात वीज दरवाढीमुळे उद्योजक हैराण झाले आहेत. त्यात विजेचा लपंडावामुळे लाईट जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सध्याचा वीजदर सुद्धा राज्यात मोठ्या प्रमाणात असून त्याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होत असल्याचे उद्योजकांचे मत आहे. सरकारने विजेची दरवाढ करू नये आणि आहे ते विजेत्या दरामध्येच कमी करावी, या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर उद्योजक भव्य मोर्चा काढणार आहेत.