चाकण मधील कंपनीच्या ऑइल साठ्याला आग…

चाकण येथील ‘मेटलॉजिक हीट ट्रीटमेंट सोलुशन्स’ या कंपनीच्या ऑइल साठ्याला काल रात्री 10.57 वा मोठी आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. चाकण एमआयडीसी अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी मरसिडिस बेन्झ कंपनी समोर आहे.

    पिंपरी : चाकण येथील ‘मेटलॉजिक हीट ट्रीटमेंट सोलुशन्स’ या कंपनीच्या ऑइल साठ्याला काल रात्री 10.57 वा मोठी आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. चाकण एमआयडीसी अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी मरसिडिस बेन्झ कंपनी समोर आहे.

    दरम्यान कंपनीच्या मोठ्या पत्राशेडमधून आगीच्या धुराचे लोट येत होते. धुराचे लोट बाहेर दूरवर पसरले होते त्यामुळे बघ्यांची गर्दी सुद्धा जमली होती. कंपनीमध्ये एका 8 फूट x10 फूट च्या कंटेनर मधील ऑइल साठ्याला आग लागली होती, त्याची खोली कोणती हे कळले नाही, मात्र त्यातील आगीच्या ज्वाला सुमारे 15 फूट उंचीवर असलेल्या छतापर्यंत जात होत्या.

    घटनेबाबत कळताच चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस सुद्धा घटनास्थळी तात्काळ पोहोचले. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात यावी म्हणून सुमारे 45 मिनिटमध्ये फोमचा वापर करून केला आणि आग आटोक्यात आणून ती विझवली. आग लागली त्यावेळी कंपनीत कोणीच कर्मचारी नव्हते, त्यामुळे सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा कुणाला दुखापत झाली नाही.