स्वागत कक्षात तक्रारदाराला मदत मिळेल ; पोलीस निरीक्षक  नितिन लाडंगे यांची ग्वाही

तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्वागत कक्षात  येणाऱ्या प्रत्येक माणसाची लेखी नोंद  ठेवली  जाईल.  तसेच  त्यांच्या  अडचणी  व प्रश्न  समजावून घेतल्या  जातील व संबंधितांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. तसेच पोलीस स्टेशन बाबतची भीती मनातून काडून टाकून तक्रारदाराला योग्य मदत करण्यात येईल, अशी ग्वाही  वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितिन लाडंगे यांनी दिली.

    तळेगाव दाभाडे : तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्वागत कक्षात  येणाऱ्या प्रत्येक माणसाची लेखी नोंद  ठेवली  जाईल.  तसेच  त्यांच्या  अडचणी  व प्रश्न  समजावून घेतल्या  जातील व संबंधितांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. तसेच पोलीस स्टेशन बाबतची भीती मनातून काडून टाकून तक्रारदाराला योग्य मदत करण्यात येईल, अशी ग्वाही  वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितिन लाडंगे यांनी दिली.

    तळेगाव दाभाडे  पोलिस ठाण्यात  नव्याने  सुरू करण्यात आलेल्या स्वागत कक्षाचे  उदघाटन  शहरातील  सर्व  पत्रकारांच्या  हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हा  स्वागत कक्ष नागरिकांच्या सोयीसाठी कार्यन्वित  झाला  आहे.  या ठिकाणी कायमस्वरूपी दोन  महिला पोलिस  कामकाज पाहणार आहेत, असे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक लाडंगे यांनी सांगितले.