Does Chief Minister Uddhav Thackeray know what Anil Parab confessed to ED? Question from BJP leader Kirit Somaiya

विधान परिषद निकालानंतर (MLC election result) आता ठाकरे सरकारचा सुद्धा लवकरच निकाल लागणार आहे, उद्धव ठाकरे सरकारचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असं भाजप नेते किरिट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ट्विटद्वारे मोठा दावा केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला (माफिया सेना) 52 मते मिळाली आहेत. 12 आमदारांचे बंड (55 शिवसेना + 9 समर्थक = 64) उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचे काऊंट डाऊन (count down) सुरू झाले आहे. त्यामुळं हे सरकार फार काळ टिकणार नाही असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगली होती. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाली. अखेर रात्री निकाल (Election Result) हाती आल्यानंतर भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर आता ठाकरे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत (Gujrat surat) येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती आहे. या सर्व पाशर्वभूमीवर महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. दरम्यान, आज शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा बैठका (Shivsena, NCP and Congress) घेत आहे, तसेच शिवसेनेसह काँग्रेसमध्ये सुद्धा बंडाला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नॉट रिचेबलनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येते आहेत, आता भाजपा माजी खासदार व नेते किरिट सोमय्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    विधान परिषद निकालानंतर (MLC election result) आता ठाकरे सरकारचा सुद्धा लवकरच निकाल लागणार आहे, उद्धव ठाकरे सरकारचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे, असं भाजप नेते किरिट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ट्विटद्वारे मोठा दावा केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला (माफिया सेना) 52 मते मिळाली आहेत. 12 आमदारांचे बंड (55 शिवसेना + 9 समर्थक = 64) उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचे काऊंट डाऊन (count down) सुरू झाले आहे. त्यामुळं हे सरकार फार काळ टिकणार नाही असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

    शिवसेनेचे हे आमदार आहेत नॉट रिचेबल

    शिवसेनेच्या नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये शहाजीबापू पाटील, महेश शिंदे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, संजय राठोड, प्रताप सरनाईक, संजय सिरसाट, रमेश बोरनारे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, संजय रायमुलकर आणि प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे.  दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच 1.00 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे.