
तिरोडा येथील अदानी पॉवर प्लॉटमध्ये (Adani Power Plot) कोळसा भरून घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू (Couple Killed in Accident) झाला असून, एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.
तुमसर : तिरोडा येथील अदानी पॉवर प्लॉटमध्ये (Adani Power Plot) कोळसा भरून घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू (Couple Killed in Accident) झाला असून, एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास तुमसर तालुक्यातील मोहाडी पोलिस ठाणे (Mohadi Police) हद्दीतील खरबी येथे घडली.
बालचंद ठोंबरे (वय 55) आणि वनिता भालचंद ठोंबरे (वय 50, रा. वरठी) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. यात नलू दामोधर बडवाईक (वय 47, रा. खरबी) या जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालचंद ठोंबरे हे तुमसर रेल्वे येथे कार्यरत आहेत. ठोंबरे कुटुंबीय हे शिर्डी, शेगाव, महाबळेश्वर येथे देवदर्शनाहून रविवारला सकाळी स्वगावी परत आले. त्यानंतर मुलाच्या सासरी नातेवाईकांना सोडण्यासाठी ते खरबी येथे आले होते.
यावेळी रस्त्याच्या कडेला उभे असताना भंडाराकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच 40 / सीडी 4737) दुचाकीला (एमएच 36 / एल 6534) जोरदार धडक दिली. यात हे पती-पत्नी जागीच ठार झाले. गंभीर जखमी महिलेच्या मानेचे हाड तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती होताच खरबीचे उपसरपंच रवी बडवाईक यांनी मोहाडी पोलिसांना माहिती दिली.
खड्डेमय रस्ता अपघाताचे कारण
तुमसर-बालाघाट हा राष्ट्रीय महामार्ग घोषित असून, वरठी ते तुमसरपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, भंडाराकडून येणारी वाहने खड्डे चुकविण्याच्या नादात अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी लाखोंचे कंत्राट काढून खड्डे न बुजवता पैसे लाटत असल्याचा आरोप करून याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.