वरंधा घाटातील अपघात चक्र सुरूच ; दोन दुचाकींच्या अपघातात खंडाळा तालुक्यातील युवकाचा मृत्यू

भोर महाड रस्त्यावरील वरंधा घाटात सोमवारी (दि.८) सायंकाळी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात जयवंत सोपान कराडे (रा.कराडवाडी ,अंदोरी ता. खंडाळा) यांचा मृत्यू झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.याबाबतची फिर्याद भोर पोलीस ठाण्यात जिजाबाई शंकर गोरे (वय ४२ रा. वरंध ता. महाड जि. रायगड) यांनी दिली.

    भोर : भोर महाड रस्त्यावरील वरंधा घाटात सोमवारी (दि.८) सायंकाळी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात जयवंत सोपान कराडे (रा.कराडवाडी ,अंदोरी ता. खंडाळा) यांचा मृत्यू झाला असून दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.याबाबतची फिर्याद भोर पोलीस ठाण्यात जिजाबाई शंकर गोरे (वय ४२ रा. वरंध ता. महाड जि. रायगड) यांनी दिली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरंधा घाटातील देवघर (ता.भोर) गावच्या हद्दीत शंकर गोरे (रा.वरंध ता.महाड) हे त्यांच्या पत्नीसह ॲक्टिव्हा मोटरसायकल (एम एच ०६ सी ई ३८४४) वरून महाडकडे जात असताना जयवंत कराडे यांच्या ताब्यातील नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल भरधाव वेगाने समोरून येऊन रस्त्याच्या दुसऱ्या साईडला जाऊन शंकर गोरे यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात शंकर गोरे व पत्नी जिजाबाई गोरे जखमी झाले असून जयवंत कराडे यांचा मृत्यू झाला आहे. गोरे यांना जखमी करण्यास व कराडे हे स्वतः त्यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याची फिर्याद गोरे यांच्या पत्नी जिजाबाई शंकर गोरे (वय ४२ वर्षे रा.वरंध ता.महाड) यांनी भोर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास भोर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजयकुमार नवले व उद्धव गायकवाड करीत आहेत.