राज ठाकरेंच्या सभेची तारीख अखेर ठरली, नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात जाणार

मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या.

    मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाविकास आघाडी आणि नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. त्यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर राज ठाकरे महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळालेल्या नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गमध्ये जाणार आहेत. तिथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ४ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता राज ठाकरे यांची कणकवलीमध्ये प्रचार्थ सभा होणार आहे.

    कणकवलीमधील उप रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नारायण राणे यांना भाजप आणि महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र अखेर आज त्यांची सभा कुठे आणि कधी होणार हे जाहीर करण्यात आले आहे. ४ मे ला त्यांची कणकवलीमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरे महायुतीच्या बाजूने प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

    रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंच्या विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. नारायण राणे आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या वैरामुळे ही निवडणूक आणखीनच रंगीन होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपकडून एकमेकांवर अनेक टीका केल्या जात आहेत. मात्र राज ठाकरे आता नारायण राणेंच्या प्रचाराला जाणार असल्याने ही लढत आणखीनच रंगीन होणार आहे.

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गात रविवारी नारायण राणे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेला मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीयेत, त्यामुळे त्यांची आठवण येते,असे नारायण राणे सभेत म्हणाले. राज ठाकरे यांची कणकवलीमध्ये पहिलीच सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.