
अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसापासून कर्नाटक महराष्ट्र सीमावाद सुुरू आहे. काल बेळगावात जाऊ पाहणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समीतीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी जाण्यापासून रोखले. तो वाज अजून शमला नसताना कर्नाटकने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार केला आहे. आता महाराष्ट्र सरकारचा विरोध डावलून कर्नाटक शासनाने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अलमट्टी धरण हे कर्नाटकातील एक महत्वाच धरण आहे. त्याची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचा कर्नाटकचा सरकारचा विचार आहे. आता कर्नाटकने उंची ५२४.२५ मीटरपर्यंत वाढवल्यास या पावसाळ्यात अतिवृष्टीत जर तेथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले, तर महत्वाच्या नद्यांना पुन्हा महाभयंकर पूर येऊ शकतो. त्यामुुळे 2005 मध्ये सांगली आणि कोल्हापुरातील महापुरासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर खोऱ्यातील सर्वच नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक उंचीने वाहून सांगली व कोल्हापुरातील हजारो हेक्टरवरची पिके वाहून जातात. सुमारे दीड ते दोन लाख लोकांना फटका बसतो. हा धोका लक्षात घेता धरणाची उंची वाढवण्याला विरोध होत आहे. अशा परिस्थितीतही कर्नाटक सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरीही कृष्णा नदीवरील कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर इतकी वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अलमट्टी धरणावर 26 अतिरिक्त दरवाजे बसवले जाणार आहेत. हे दरवाजे बसवण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. आधीच सिमावादामुळे दोन्ही राज्याच वातावरण बिघडलं असतानाही कर्नाटक सरकार नव्या काय खुरापती करणार याचा नेम राहिलेला नाही.