dilip walse patil

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भारत सरकारने जगभरातील मुस्लिम समाजाची माफी मागावी या मागणीसाठी हॅकर्सनी अनेक वेबसाईट हॅक केली आहे. (Nupur Sharma Prophet Muhammad Controversy cyber attacks) अल-कायदा या दहशतवादी संघटनेनंही (Al-Qaeda is a terrorist organization) भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

    मुंबई : देशात मागील काही दिवसांपासून दंगली भडकविण्याचा किंवा दोन समजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील आठवड्यात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद (Mohammad Paigambar) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगात संतापाची लाट उसळली आहे. तसेच अनेक दहशतवादी संघटना भारतावर हल्ला (Terrorist organization attacks India) करण्याची धमकी सुद्धा देत आहेत.

    दरम्यान, भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भारत सरकारने जगभरातील मुस्लिम समाजाची माफी मागावी या मागणीसाठी हॅकर्सनी अनेक वेबसाईट हॅक केली आहे. (Nupur Sharma Prophet Muhammad Controversy cyber attacks) अल-कायदा या दहशतवादी संघटनेनंही (Al-Qaeda is a terrorist organization) भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तर आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरुन सायबर हल्ले होताना दिसतायत. (cyber attacks) तसेच अनेक शहरांत दंगली सुद्धा होताना दिसत आहे.

    याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी माध्यमाशी संवाद साधला, दरम्यान, समाजात मुद्दाम तेढ निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न होतोय, शांतता व सलोख्याचे वातावरण असताना दंगली व हिंसाचार घडविला जात आहे, त्यांच्यावर कारवाईचा निर्णय पंतप्रधानांनी घ्यावा, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. (india pm modi should decide on the action says dilip walse patil) तसेच यांच्यावर कडक कारवाई सुद्धा करण्यात यावी असं सुद्धा गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.