परीक्षेसंदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार संचालक निर्णय घेतील; उदय सामंत यांची माहिती

परीक्षेसाठी सर्व विद्यापीठांनी एकच समान पद्धत वापरावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. टाळेबंदीनंतर विस्कटलेली शैक्षणिक गणिते आणि त्यामुळे निर्माण झालेली विषमता याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  पुणे : परीक्षेसाठी सर्व विद्यापीठांनी एकच समान पद्धत वापरावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. टाळेबंदीनंतर विस्कटलेली शैक्षणिक गणिते आणि त्यामुळे निर्माण झालेली विषमता याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समान परीक्षेसंदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार संचालक निर्णय घेतील. गरज पडली तर मी हस्तक्षेप करेल, असे उदय सामंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

  सामंत नेमकं काय म्हणाले? 

  मी विद्यापीठांना सूचना केल्या आहेत. विद्यापीठांनी समानतेने परीक्षा घेत ऑफलाईन परीक्षाच घेण्यात याव्या, असेही मी सांगितले आहे. डेक्कन म्युझियमसाठी आज आर्थिक तरतूद करण्यात आली. हे अभिमत विद्यापीठ शनिवार आणि रविवार खुले ठेवण्याचे आयोजन केले आहे, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

  सामंत म्हणाले की, काल केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. राज्याचे ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथील विद्यार्थी येथे आहेत. या जिल्ह्याचे नाव घेण्याचे कारण येथील शेतकऱ्याचे मुलांना यात घवघवती यश मिळावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले आहेत. या परीक्षेत महिला सक्षम असल्याचं दिसलं आहे. यानिमित्ताने अनेकांच्या डोळ्यांत अंजन गेले आहे, असा टोलाही त्यांनी मारला आहे.

  लोकसेवा आयोगमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरू निवडण्याचे अधिकार राज्यपाल महोदय यांनाच आहे. त्यामुळे त्यात आम्ही हस्तक्षेप करत नाही. सीईटीसाठी पुढील वर्षी १ जुलै रोजी निकाल लागावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  उदय सामंत म्हणाले, की मी विद्यापीठाच्या कल्याणासाठी विद्यापीठात जात असतो. त्यामुळे आधी आठ दिवस सांगत नाही. काहींना हेदेखील आवडत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणाले होते, की उदय सामंतांचा विद्यापीठात हस्तक्षेप वाढला आहे. पण मी का विद्यापीठात हस्तक्षेप केला, मी ही 28व्या वर्षी आमदार झालो, मलाही कळते कोणाला कसे एक्स्पोज करायचे, अशी नाव न घेता उदय सामंत यांनी माजी कुलगुरू डॉ. नितीन कळमकर यांच्यावर टीका केली आहे.