
इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर एका महाविद्यालयीन तरुणीला डॉक्टरने ऑफिसमध्ये बोलवत तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुणे : इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर एका महाविद्यालयीन तरुणीला डॉक्टरने ऑफिसमध्ये बोलवत तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉ. शुभंकर महापुरे (वय २६,रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी परगावाची आहे. ती पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. ती हॉस्टेलवर रहाते. दरम्यान, तिची ओळख डॉ. महापुरे याच्याशी इन्स्टाग्रामवरून झाली होती. ओळखीनंतर त्यांच्यात बोलणे सुरू झाले. त्याचवेळी डॉ. महापुरे याने तरुणीला जेवण करण्यासाठी नारायण पेठेतील कार्यालयात बोलावून घेतले.
जेवण करण्यापूर्वी दारू पाजली. दारू प्याल्याने तरुणीला गुंगी आली. तेव्हा महापुरेने तिच्यावर बलात्कार केला. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर घाबरली. तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.