मुंबईत घर असल्याचे स्वप्न आता लवकरच होणार पूर्ण; पुढील महिन्यात कोकण म्हाडाच्या घरांची सोडत

    मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला वाटते आपल मुंबईत घर असाव, कारण खायला अन्न, हाताला काम मिळणं सोप पण राहायला झप्पर मिळणं सगळ्यात कठीण.किंबहुना मुंबईतील ज्या ७० टक्के रोजगार वर्गामुळे सगळी काम अगदी मिनिटांत होतात त्याचं कामगाराकडे मुंबईत स्वतचं घर नाही ही मुंबईची शोकांतीका आहे.

    वर्षात किमान दोन ते तीन वेळेस मुंबईतील म्हाडाच्या घराची सोडत निघते. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये मुंबई म्हाडा कडून जवळपास 9 हजार घरांची सोडत काढली होती त्यासाठी 46 हजारांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले होते. तरी आता पुन्हा एकदा कोकण म्हाडाची डिसेंबरमध्ये  सोडत काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकण म्हडामध्ये येणारे ठिकाणे कोणती ते जाणून घ्या.

    ठाणे , कल्याण-डोंबिवली , नवी मुंबई, वसई-विरार या भागात घरांची सोडत काढल्या जाणार आहे. ही घर मुंबईत नसून मुंबई उपनगरात असल्याने ही सर्वसामान्याना परवडणाऱ्या भावात उपलब्ध असतील. तरी तुम्ही म्हाडाच्या  या लॉटरीत किंवा मुंबई नजिकच्या उपनगरात घर घेण्यास उत्सुक असाल तर हो ही सोडत तुमच्यासाठी आहे. कोकण म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची सविस्तर माहिती लवकरच म्हाडा कडून अधिकृतरित्या घोषित करण्यात येईल.