जगातले आठवे आश्चर्य म्हणजे श्रीसेवकांचे कार्य; देवेंद्र फडणवीस यांचे गौरवद्गार…

जगातले आठवे आश्चर्य म्हणजे तुम्ही आहात, श्रीसेवका आहेत. शरीर स्वच्छ करता येतं, पण मन स्वच्छ कसं करता येणार, मन स्वच्छ केल्यानं गरिबीत ही समाधानानं राहता येतं. आप्पासाहेबांचे कार्य महान व मोठे आहे. हा विलक्षण योगायोग आहे, नानासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आप्पासाहेबांना हा पुरस्कार मिळतो. हा योगायोग आहे.

    नवी मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. खारघरमध्ये वीस ते पंचवीस लाख अनुयायी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारावेळी शाल, मानपत्र, 25 लाखांचा धनादेश आणि मानचिन्ह तसेच 10 फुटांचा गुलाबाचा हार, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना श्रीसेवकांच्या वतीनं देण्यात आला. दरम्यान, व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM), मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे आदी नेते व मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मागील पंधरा दिवसांपासून जोरदार व जय्यत तयारी सुरु होती. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा देखील घेतला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्माधिकारी यांचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी खारघरमध्ये दाखल झालेत.

    जगातले आठवे आश्चर्य – फडणवीस

    जगातले आठवे आश्चर्य म्हणजे तुम्ही आहात, श्रीसेवका आहेत. शरीर स्वच्छ करता येतं, पण मन स्वच्छ कसं करता येणार, मन स्वच्छ केल्यानं गरिबीत ही समाधानानं राहता येतं. आप्पासाहेबांचे कार्य महान व मोठे आहे. हा विलक्षण योगायोग आहे, नानासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आप्पासाहेबांना हा पुरस्कार मिळतो. हा योगायोग आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लिमक बुक ऑफमध्ये रेकॉर्ड झाले आहे. आपल्या घराण्याचा चारशे वर्षाचा इतिहास आहे. धर्माधिकारी यांचे वंशंज महाराजांसोबत होते. धर्मजागरणाचे काम आज आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, वक्षारोपन आदी कामं यातून धर्माधिकारी व श्रीसेवकांचे कार्य दिसते. आज मला येथे येण्याचे भाग्य मिळाले, असं फडणवीस म्हणाले.

    आप्पासाहेबांच्या कामाचं कौतुक…

    अंधश्रद्धा निर्मुल, व्यसनमुक्ती, वृक्षारोपणाच्या कार्यामुळं मोठं परिवर्तन झालं. २५ लाखांपेक्षा जास्त वृक्ष श्री सद्स्यांनी लावलेत. ५ जंगलांचं व्यवस्थापन करतायेत. जल व्यवस्थापनाचं काम करतायेत. मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम केलंय. १३ जिल्ह्यात जल पुनर्भरणाचं काम, रक्तदान शिबिरं देशासह इतर अनेक देशांतही केलीयेत. आरोग्य, जलजागृतीची शिबिरं मोठ्या संख्येनं प्रतिष्ठाननं केलेले आहे. स्वच्छतेसाठी मोठं काम केलं आहे. गरिबांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं कामही मोठं आहे. पश्चिमी विचार जगाला बाजार समजतो. भारतीय विचार हा जगाला बाजार समजत नाही, परिवार समजतो. हाच विचार अप्पासाहेबांनी सातत्यानं मांडला. कोट्यवधी लोकं समाजसुधारणेचं काम करतायेत. दासबोधाचं निरुपण करताना मनात संस्कारांचं रोपण केलं आहे. समाजात चांगल्या प्रकाराचं काम करतोय. अप्पासाहेब यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देईन.

    श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी…

    दरम्यान, खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीसेवक दाखल आहेत, 20 ते 25 लाख श्रीसेवक आले असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यावेळी दाखल झालेल्या श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. गावाखेड्यातून, ग्रामीण भागातून, गावागावातून अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले आहेत. दोन दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, या सोहळ्याला साधारण 20 लाखांपेक्षा श्रीसदस्य उपस्थित राहतील. त्यामुळे या सोहळ्याचे नियोजन नीट असावे, सुरक्षा कटेकोट असावी, पोलिस बंदोबस्त तैनात असावा, आदीच्या तयारीची बैठक घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळं या कार्यक्रमाला राज्यभरातून धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी आले आहेत.