पक्षाची ताकद दाखविण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे उतरले मैदानात; राष्ट्रवादी, ठाकरे गटाकडून जिल्ह्यात सभा

आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते रिंगणात उतरले आहेत.

    जळगाव : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते रिंगणात उतरले आहेत. दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या पक्षाची ताकद आजमावण्यासाठी तसेच पदाधिकारी कार्यकत्यांना बळ देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात येत आहेत.

    पक्षांतर्गत फूटीनंतर माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जिल्ह्यात पहिली सभा होत आहे. यापूर्वीही त्यांचा दौरा नियोजित होता. पण पाऊस व अन्य कारणांमुळे त्यावेळी हा दौरा स्थगित झाला होता. आता ५ सप्टेंबरला त्यांचा दौरा होणार आहे. मात्र, यावेळी रणनिती बदलत सभा एकाच ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यासाठी जळगाव शहरातील सागर पार्कची निवड करण्यात आली आहे.

    पाच मतदारसंघात विधानसभेची चाचपणी

    शिवसेनेच्या जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व चोपडा या पाच मतदार संघावर लक्ष केंद्रीत करुन तेथील संभाव्य उमेदवारांच्या सावंत यांच्याकडून भेटी घेतल्या जात आहेत. जळगाव शहरात महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे या तिघांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे.