अजिंक्यतारा कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ; 21 जागांसाठी बुधवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सातारा तालुक्यातील राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे सहकार विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 21 जागांसाठी बुधवारपासून अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 

    सातारा : सातारा तालुक्यातील राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे सहकार विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 21 जागांसाठी बुधवारपासून अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

    कारखान्यासाठी 17 जुलै रोजी मतदान होणार असून 19 जुलैला मतमोजणी होणार आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे तालुक्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर शिक्षकांची अर्थवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकांची तयारी सहकार प्राधिकरणाकडून सुरू आहे त्यातच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने सातारा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे सहकार प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वीच लोकनेते बाळासाहेब देसाई आणि रयत सहकारी साखर कारखाना यांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता अजिंक्यतारा कारखान्यासाठी पाच व्यक्ती ऊस उत्पादक सभासद होत आहे यामध्ये सातारा नागठाणे अतीत चिंचवड गोव्या गटामधून प्रत्येकी तीनशे पंधरा सदस्य निवडून दिले जाणार आहेत याचबरोबर बिगर संस्था व पनन प्रतिनिधी एक अनुसूचित जाती जमाती एक विमुक्त जाती व भटक्या जमाती एक ओबीसी एक आणि महिला राखीव दोन असे 21 संचालक सभासदांना निवडून द्यावे लागणार आहेत कारखान्याचे सुमारे 23 हजार सभासद असून त्यांचे मतदान 19 जुलै रोजी होणार आहे 15 जून रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे 21 जून पर्यंत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे 22 रोजी दाखल झालेल्या उमेदवारांची छाननी आणि त्यानंतर दिनांक 23 उमेदवारी यादी प्रसिद्ध होणार आहे दिनांक सात जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून आठ जुलै रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे 23 हजार सभासद दिनांक 17 जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.