तलाठी परीक्षा देण्यासाठी आलेले परीक्षार्थी ताटकळले; सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षा सेंटरवर विद्यार्थ्यांची गर्दी

ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. महाराष्ट्रभरातून आलेले विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून लातूरच्या परीक्षा केंद्राबाहेर हजर होते. यवतमाळ, हिंगोली नांदेडसारख्या भागातून आलेले विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

    बीड – बीडमध्ये तलाठी परीक्षा (Talathi Exam) देण्यासाठी आलेले परीक्षार्थी ताटकळत बसले आहेत. सर्व्हर डाऊन (server is down) असल्याने तलाठी परीक्षा सेंटरवर विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. नऊ वाजता पेपर सुरू होणार होता. आणि त्यापूर्वी सात वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाणार होते. मात्र, सर्वर डाऊन असल्याने विद्यार्थी खोळंबले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यातून आलेले आहेत. सकाळी चार वाजल्यापासून हे विद्यार्थी ठाण मांडून आहेत. मात्र, दहा वाजले असताना देखील त्यांना सोडण्यात आलेले आहे. एकंदरीत तलाठी परीक्षेत सर्व्हर डाऊन असल्याने हा गोंधळ पाहायला मिळतो आहे. (he examinees who came to give the Talathi exam were shocked; There is a rush of students at the exam center as the server is down)

    राज्यातील अनेक ठिकाणी सर्वर डाऊन

    दरम्यान, आज राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरु आहे, मात्र या परीक्षेत आज सर्व्हरचं संकट आलं आहे. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. अकोला जिल्ह्यातील दोन्ही परिक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप. जिल्ह्यात बाभूळगाव आणि कापशी येथे दोन परिक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा होती. तर नागपूरसह जवळपास सर्वच केंद्रांवर ही परीक्षा सुरू झालेली नाही. नागपूरच्या vmv महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेसाठीच्या प्रवेश पत्र हातात घेऊन उभे आहेत.

    4 हजार 644 जागांसाठी 10 लाख 41 हजार अर्ज 

    महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून 10 लाख 41 हजार इच्छुकांनी अर्ज सादर केला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेच्या शुल्कावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. महाराष्ट्रभरातून आलेले विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून लातूरच्या परीक्षा केंद्राबाहेर हजर होते. यवतमाळ, हिंगोली नांदेडसारख्या भागातून आलेले विद्यार्थी संतप्त झाले आहेत.