ram navmi

आज राम नवमी संपूर्ण देशासह राज्यभरात साजरी केली जात आहे. तसेच सकाळपासून अयोध्यात प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तर अयोध्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर राज्यभरात देखील मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी होत आहे.

मुंबई– आज प्रभू श्रीराम (Shree Ram) यांचा जन्मदिन म्हणून संपूर्ण देशात राम नवमीचा (Ram Navami) सण साजरा केला जातो. भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला. राम नवमी हा हिंदू (Hindu) धर्मातील शुभ सणांपैकी एक आहे. श्री राम नवमीचा सण दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी देशासह राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरम्यान, राम नवमीनिमित्त देशासह राज्यातील विविध मंदिरं सजली आहेत, तर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

अयोध्यासह राज्यातील मंदिरात गर्दी…

दरम्यान, आज राम नवमी संपूर्ण देशासह राज्यभरात साजरी केली जात आहे. तसेच सकाळपासून अयोध्यात प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तर अयोध्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर राज्यभरात देखील मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी होत आहे. प्रसिद्ध शिर्डीत कालपासून राज्यभरातून पालख्या दाखल झाल्या आहेत, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली आहे. दुसरीकडे बुलढाण्यातील शेगाव मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केलीय. नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात सकाळपासून भाविकांची रिघ लागली आहे. तसेच नागपूर, मुंबईत वडाळ्यातील राम मंदिरात सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी केली आहे.

शेगावात दोन लाख भाविक…

राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावातील संत गजानन महाराज मंदिरात दाखल झाल्या असून, आज सकाळी सात वाजता आरतीने रामनवमी मुख्य उत्सवास सुरूवात होणार आहे. दुपारी रथ, अश्वासह पालखीची नगर परीक्रमा असे दिवसभर अनेक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात संत गजानन महाराज मंदिरात श्री राम जन्मोत्सव उत्सवाला सुरूवात झाली आहे. साडेपाचशे दिंड्यांसह दोन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

मुख्यमंत्र्यांकडून राम नवमीच्या शुभेच्छा…

श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, पती आणि राजा म्हणून श्रीरामाकडे पाहिले जाते. अयोध्येतही श्रीरामाचे अतिशय सुंदर असे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी आम्ही लवकरच तिथंही जाणार आहोत. रावणाचा संहार करणाऱ्या आणि राक्षसी प्रवृत्तींना नेस्तनाबूत करणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणतात.