The farmer committed suicide and before that a case was registered as written in a note

पहाटे ५ च्या वाजताचे सुमारास फिर्यादीचे मृतक पती यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मृतक गजानन यांनी त्यांच्या स्वतः च्या हस्ताक्षरात माझ्या आत्महत्येचे कारण सात लोक असून ते नेहमी वाद करीत होते व जिवे मारण्याची धमकी देत होते, त्यांच्या पायी त्रासलो व तेच आत्महत्येस जाबाबदार आहे, अशी चिठ्ठी त्यांच्या खिशात मिळाली आहे.

    झरी जामणी : जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने (farmer) गळफास लावून आत्महत्या (suicide ) केल्याची घटना तालुक्यातील अडेगाव येथे रविवारी घडली होती. मृतकाचे मृत्यू पूर्वी चिठ्ठीत (Suicide Note) सात लोकांची नावे लिहिली असून, त्या सात जणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोमवारी मुकूटबन पोलिसांनी (Mukutban Police) गुन्ह्याची नोंद केली आहे.

    गजानन मर्लिधर हुलके (४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर श्रीराम मोरेश्वर थेरे (३०), सुचिता श्रीराम थेरे (२५), बंडू कवडु गोहणे (३०), कोंडु कवडु गोहणे (३२), कलाबाई कवडू गोहणे (६०), दत्ता जगन पाल (५०), दिपक दत्ता पाल (२३) सर्व अडेगांव असे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रमाणे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी पहाटे ३१ जुलै रोजी गजानन हुलके यांनी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

    घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान व एएसआय विजय चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली. शवविच्छेदन नंतर अडेगाव येथील नातेवाईकानी ज्या लोकांच्या त्रासामुळे गजाननने आत्महत्या केली, त्यांच्यावर गुन्हे नोंदवा, अन्यथा अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा घेतला. मुकूटबनचे ठाणेदार अजित जाधव सुट्टीवर असल्यामुळे प्रभारी ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी नातेवाईकांची समजूत घालून कारवाईचे आश्वासन देऊन अंत्यविधी करण्यास सांगितले.

    अंत्यविधी पार पडल्यानंतर नंतर सोमवारी गयाबाई गजानन हुलके वय (३५) मृतक गजानन च्या पत्नीने मुकुटबन ठाण्यात तक्रार दिली. चिठ्ठीतील सात जण व फिर्यादी यांचे मृतक पती हे नातेवाईक असून व घरशेजारी आहेत. त्यांचे नेहमी घराच्या जागेच्या कारणावरुन वाद होत होता. मागील आठ दिवसापासून आरोपी हे मृतक यांच्या सोबत झगडा भांडण करीत होते. यातील आरोपीने संगणमत करुन फिर्यादी व त्यांच्या पती सोबत घरासमोरील झाडाच्या फांद्या छाटण्याच्या कारणावरून वाद करुन शिवीगाळ केली व जिवाने मारण्याची धमकी दिली. आरोपी यांचे सतत भांडणामुळे फिर्यादीचे मृतक पती मानसिक तणावात होते.

    पहाटे ५ च्या वाजताचे सुमारास फिर्यादीचे मृतक पती यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मृतक गजानन यांनी त्यांच्या स्वतः च्या हस्ताक्षरात माझ्या आत्महत्येचे कारण सात लोक असून ते नेहमी वाद करीत होते व जिवे मारण्याची धमकी देत होते, त्यांच्या पायी त्रासलो व तेच आत्महत्येस जाबाबदार आहे, अशी चिठ्ठी त्यांच्या खिशात मिळाली आहे. वरुन नमुद आरोपी यांनी संगणमत करुन फिर्यादीचे यांचे पतीस आत्महत्येस प्रवृत्त केले. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भांदवी ३०६, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या सात ही जण फरार असून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव (Thanedar Ajit Jadhav) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान, एएसआय विजय चव्हाण व संजय खांडेकर करीत आहे.