शेतकऱ्याने चक्क जनावरांना खाऊ घातला २० टन कांदा; काय आहे कारण?

हिंगोलीतील औंढा तालुक्यातील उमरा गावातील शेतकाऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने रागाच्या भरात आपल्या शेतातील आपला २० टन कांदा जनावरांना खाऊ घातला आहे. इतका मोठ्या प्रमाणात कांदा हा शेतकऱ्याने जनावारांना खाऊ घातल्याने सचिन बोंगाने या शेतकऱ्याची चर्चा संपूर्ण हिंगोलीत सुरू झाली आहे.

  हिंगोली : शेतकऱ्यांना कांद्याने रडवायला सुरुवात केली आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्यातून खरिपाच्या पेरणीसाठी लागणारा खर्च मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना असते. दरवर्षी खरिपाच्या पेरणीसाठी लागणारा खर्च मिळून देणाऱ्या कांदा पिकाने यंदाच्या वर्षी मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. त्यामुळे हिंगोलीसहित राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

  चार महिने शेतात कष्ट करून शेकडो क्विंटलचे उत्पादन घेतलेल्या कांद्याला सद्यस्थितीत कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळं हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील उमरा गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांदा जनावरांच्या पुढे टाकला आहे. सचिन बोंगाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

  हिंगोलीमधील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खरिपाच्या पेरणीचा खर्च यंदाच्या कांद्यातून निघेल अशी हिंगोलीतील अनेक शेतकऱ्यांना होती. मात्र, कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे क्विंटल उत्पादन घेऊनही भाव मिळत नसल्यानं आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांना दरवर्षी कांद्यातून खरिपाच्या पेरणीचा खर्च मिळतो. मात्र, यंदाच्या वर्षी खरिपाच्या पेरणीचा खर्चही कांद्यातून मिळत नसल्याने कांदा पिकाने शेतकऱ्यांना रडवलं आहे.

  दरम्यान हिंगोलीतील औंढा तालुक्यातील उमरा गावातील शेतकाऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने रागाच्या भरात आपल्या शेतातील आपला २० टन कांदा जनावरांना खाऊ घातला आहे. इतका मोठ्या प्रमाणात कांदा हा शेतकऱ्याने जनावारांना खाऊ घातल्याने सचिन बोंगाने या शेतकऱ्याची चर्चा संपूर्ण हिंगोलीत सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.

  सचिन बोंगाने हे शेतकरी असून हिंगोली जिल्ह्यात शेती करतात. त्यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये या कांद्याची लागवड केली होती. आतापर्यंत या कांदा पिकावर ८१ हजार रुपये एवढा खर्च आला होता. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी शेतामधील कांदा पीक काढून ते विक्री करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गेले. त्यावेळी त्यांना कांदा पिकाच्या दराची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना बाजारात कांदा दोन ते चार रुपये प्रति किलो दराने विक्री होत असल्याचं त्यांना समजलं. दोन ते चार प्रति किलो दराने कांदा विक्री होत असल्यानं शेतकरी सचिन बोंगाने यांचा हिरमोड झाला.

  शेतकरी बोंगाने यांना कांद्याचे भाव वाढतील आणि खरिपाच्या पेरणीचा खर्च निघेल अशी आशा त्यांना होती. या आशेवर त्यांनी मागच्या पंधरा दिवसांपासून स्वतः राहत असलेल्या शेतातील घरामध्ये कांद्याची साठवणूक केली होती. परंतु दररोज कांद्याचे भाव घसरत असल्याने आज बोंगाणे यांनी रागाच्या भरात संपूर्ण २० टन कांदा हा त्यांच्या जनावरांना खाऊ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.