शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र काढली आमदाराच्या घरासमोर; धानाचे चुकारे रखडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

    गोंदिया : गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

    काल दिवसभर 35 डिग्री तापमान असतानासुद्धा भर उन्हात शेतकरी आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर बसून होते. रात्री उशिरापर्यंत देखील शेतकऱ्यांनी हा ठिय्या मागे घेतलेला नव्हता. जोपर्यंत हातात पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

    यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह शासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आमदारांची कुठलीही गोष्ट ऐकायच्या मानसिकतेत नाहीत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमदार अग्रवाल यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचा हा आंदोलन सुरु होते.

    शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात 

    तांदूळ उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील शेकडो शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत. त्यामुळं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. चार महिन्यांपासून वारंवार जिल्हा पणन कार्यालयाच्यावतीनं शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे चुकारे न मिळाल्यानं अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं. जोपर्यंत हातात पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी आमदारांची कुठलीही गोष्ट ऐकायच्या मानसिकतेत नाहीत.