Betel nut to wrestlers to kill Sakhya's brother-in-law; Attack on youth on Apte street; PUNE CRIME

मुलींना घेण्यास आलेल्या वडिलांवर गावातील आरोपीने धारदार शस्त्राने (Attack on Man) मागून हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास सातनवरी येथे घडली.

    बाजारगाव : मुलींना घेण्यास आलेल्या वडिलांवर गावातील आरोपीने धारदार शस्त्राने (Attack on Man) मागून हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास सातनवरी येथे घडली. सुभाष रामचंद्र कुंभारे (वय 45, रा. सातनवरी) असे जखमीचे तर आदेश उईके (वय 24, रा. सातनवरी) असे आरोपीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सुभाष कुंभारे यांच्या दोन मुली शिवासावंगा येथील बारुद कंपनीत कामाला आहे. त्या रात्रीच्या सुमारास कंपनीच्या वाहनाने सातनवरी येथे परत येत असतात. त्यामुळे वडील सुभाष व पत्नी सुनिता हे मुलींना घ्यायला गेले. ते मुलींना सोबत घेऊन घराकडे येत असता पाळतीवर असलेल्या आरोपी आदेशने सुभाष यांच्यावर मागून धारदार शस्त्राने वार केले. यात सुभाष हे गंभीर जखमी झाले.

    जखमी सुभाष यांनी मदतीसाठी केलेली आरडाओरड ऐकून दोन्ही मुलींनी वडिलांच्या दिशेने धाव घेतली. यादरम्यान आरोपी आदेश हा घटनास्थळावरून पसार झाला. जखमी सुभाष यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी घटनेची नोंद करुन आरोपी आदेश उईके याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.