पूजा चव्हाण प्रकरणातील राठोड यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील

पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड यांनीही शपथ घेतली आहे. संजय राठोडांच्या शपथविधीनंतर भाजपच्या चित्रा वाघांनी टीका करत पूजा चव्हाण प्रकरणातील माझा त्यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील असे सांगितले.

    मुंबई : राज्यातील नव्या सरकारातील मंत्र्यांचा शपथविधी (Oath Ceremony) पार पडला आहे. यावेळी, पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या (BJP) ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड (Sanjay Rathore) यांनीही शपथ घेतली आहे. संजय राठोडांच्या शपथविधीनंतर भाजपच्या चित्रा वाघांनी (Chitra Wagh) टीका करत पूजा चव्हाण प्रकरणातील माझा त्यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील असे सांगितले.

    पूजा चव्हाणच्या मृत्युला (Pooja Chavan Death) कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.