बल्लारपूर येथील पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आग अद्याप सुरूच

    चंद्रपूर – जिल्हा व आसपासच्या अग्निशमन यंत्रणांच्या 40 बंबानी 350 हुन अधिक  फे-या करूनही आग धुमसणे जारीच,रात्रभर चालले आग विझविण्याचे कार्य, 20 एकरावर पसरलेल्या लाकूड डेपोची झाली राख, 50 कोटींहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज, पहाटे या महामार्गावरील वाहतूक करण्यात आली सुरू, याच डेपोच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला लागली होती आग, मात्र साठा नसल्याने पंप 3 दिवसापासून बंद असल्याने मोठी हानी टळली, प्रचंड आग- सोसाट्याचा वारा आणि जलस्त्रोतापासून जास्त असलेले अंतर यामुळे अग्निशमन बंबाना पाणी भरून आणण्यासाठी लागतोय वेळ, सकाळपासून अग्निशमन कार्याने घेतला वेग चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे पेपर मिल लाकूड आगाराला लागलेली आग अद्याप सुरूच आहे. जिल्हा व आसपासच्या अग्निशमन यंत्रणांच्या 40 बंबानी 350 हुन अधिक  फे-या करूनही आग धुमसणे जारीच आहे. रात्रभर ही आग विझविण्याचे कार्य चालले. 20 एकरावर पसरलेल्या लाकूड डेपोची यात राख झाली. 50 कोटींहून अधिक रकमेच्या साठ्याचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आग कमी झाल्यावर पहाटे या महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. याच डेपोच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपाला आग लागली होती. मात्र साठा नसल्याने पंप 3 दिवसापासून बंद होता व त्यामुळे मोठी हानी टळली. प्रचंड आग- सोसाट्याचा वारा आणि जलस्त्रोतापासून जास्त असलेले अंतर यामुळे अग्निशमन बंबाना पाणी भरून आणण्यासाठी वेळ लागतोय.  सकाळपासून अग्निशमन कार्याने वेग घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जुन्या बल्लारपूर पेपर मिल उद्योगाने लाकूड आगारात अग्निशमन यंत्रणा उभारताना अक्षम्य हलगर्जीपणा दाखविल्याने जिल्हा व आसपासच्या यंत्रणांना नाहक त्रास आणि आगीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय. जिल्हा प्रशासन या उद्योगावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.