संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

ताडोबा प्रकल्पाच्या निमढेला प्रवेशद्वारावर कामावर असलेल्या रोजंदारी सफाई कामगाराला वाघाने फरफटत नेत ठार केल्याची थरारक घटना गुरुवारी घडली. पर्यटकांसमोरच घडलेल्या या भयंकर घटनेने खळबळ उडाली.

    चिमूर / चंद्रपूर : ताडोबा प्रकल्पाच्या निमढेला प्रवेशद्वारावर कामावर असलेल्या रोजंदारी सफाई कामगाराला वाघाने फरफटत नेत ठार केल्याची थरारक घटना गुरुवारी घडली. पर्यटकांसमोरच घडलेल्या या भयंकर घटनेने खळबळ उडाली.

    रामभाऊ रामचंद्र हनवते (वय 52) असे मृत कामगाराचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 59 लगत बफर झोन रामदेगी निमढेला गेटवर रामचंद्र काम करत असताना कुटी समोरच्या देवबाबरीत दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

    वाघाने पर्यटकांसमोरून त्यांना फरफटत नेत ठार मारले. हल्लेखोर भानुसखिंडीचा बछडा असल्याचे समजते. घटना कळताच वनविभाग अधिकारी व शेगाव पोलिस घटनास्थळी आले. शोधाशोध केल्यावर 100 मीटरवर मृतदेह आढळून आला.