घरात बसून सरकार चालत नसते ; बबनराव पाचपुते  यांचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरघर कालच्या विधानपरिषद निवडणूक निकालात लागली होती. घरात बसून सरकार चालत नसते. आता शिवसेनेत फूट पडल्याचे समोर आल्यावर भाजपचे सरकार पुन्हा येणार हे निश्चित आहे.

    अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरघर कालच्या विधानपरिषद निवडणूक निकालात लागली होती. घरात बसून सरकार चालत नसते. आता शिवसेनेत फूट पडल्याचे समोर आल्यावर भाजपचे सरकार पुन्हा येणार हे निश्चित आहे. या घडामोडींवर आमचे नेते देवेंद्र फडणवीस हाताळत असून ते काय करतात, हे पाहणासाठी वाट पाहावी लागेल, असे सूचक वक्तव्यही बबनराव पाचपुते यांनी केले आहे.

    विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे  यांनी शिवसेनेचे काही आमदार घेऊन गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.  यातच श्रीगोंद्यातील भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी शिवेसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    – भाजप शिवाय स्थिर सरकार नाही
    पाचपुते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे काय करतात याचा अनुभव आघाडी सरकारने याआधी घेतला असून आठवड्यात दोन वेळा त्यांनी आघाडीला दिलेले धक्के असह्य झाले आहेत. आता शिवसेना फुटल्याचे समजते. मुळात मुख्यमंत्री घरात बसून सरकार चालवित होते. त्याचा फायदा त्यांच्या सहकारी पक्षांनी अलगद घेतला. त्यामुळे शिवसेनेची बंडाळी झाल्याचे दिसते. आता राज्याला भाजप शिवाय स्थिर व मजबूत सरकार कोणी देऊ शकत नसल्याचे वास्तव आहे. लवकरच ते होईल, असा विश्वासही बबनराव पाचपुते यांनी यावेळी व्यक्त केला.