जनतेच्या मनातील सरकार लवकरच येणार; भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री गुवाहाटीला रवाना झाल्याने राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी मुख्यमंत्र्यांचे मंत्री व आमदार मोठ्या प्रमाणात फुटून गेल्याने आता जनतेच्या मनातील सरकार लवकरच येणार असून, या नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन मंत्री करावे, असा ठरावच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केल्यामुळे चिंताच राहिली नाही. 

    अहमदनगर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री गुवाहाटीला रवाना झाल्याने राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी मुख्यमंत्र्यांचे मंत्री व आमदार मोठ्या प्रमाणात फुटून गेल्याने आता जनतेच्या मनातील सरकार लवकरच येणार असल्याचे विधान आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केले.

    विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल आमदार प्रा.राम शिंदे यांचा सत्कार सोहळा जिल्हा भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे, शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, चंद्रशेखर कदम, स्नेहलता कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

    राम शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री गुवाहाटीला रवाना झाल्याने राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी मुख्यमंत्र्यांचे मंत्री व आमदार मोठ्या प्रमाणात फुटून गेल्याने आता जनतेच्या मनातील सरकार लवकरच येणार असून, या नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन मंत्री करावे, असा ठरावच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केल्यामुळे चिंताच राहिली नाही

    …पण मला कायम माजीच ठेऊ नका : शिवाजीराव कर्डिले

    माजी राज्यमंत्री आणि आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणारे कर्डिले यांनी ‘मी माजी आहे. पण मला कायम माजीच ठेवू नका’, असे म्हणताच सभागृहात एकच हाशा पिकला. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा वारसा असलेले राष्ट्रीय राजकारणात झोकून दिल्यामुळेच प्रा.राम शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळाली.