संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नुकतीच फेटाळून लावली.

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नुकतीच फेटाळून लावली.

माजी राज्यपाल कोश्यारी यांचा हेतू समाजाचे प्रबोधन करण्याचा होता, कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर करण्याचा नव्हता असे निरीक्षण न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना आदेशात नमूद केले. राज्यपालांची विधाने इतिहासाच्या विश्लेषणात्मक आहेत. ही विधाने राज्यपालाचा सामाजिक दृष्टीकोन दाखवतात. श्रोत्यांनी समाजाभीमूख दृष्टीकोन आत्मसात आणि आचरणातही आणावा हा त्या विधानांमागील उद्देश होता. त्यामुळे ही विधाने प्रथमदर्शनी कोणत्याही महापुरुषांचा अवमान करणारी नाहीत म्हणूनच ती फौजदारी कायद्यानुसार शिक्षेस पात्र ठरत नाहीत, असेही निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदवून याचिका फेटाळून लावली

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम २०१५ (सुधारित) कलम ३ (१)(५) अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली होती.

राज्यपाल आणि भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळेअनुसूचित जाती सोबतच सर्वसामान्य लोकांची भावना दुखावली असल्याचा आरोप याचिकर्ते रामा कटारनावरे यांनी केला होता. याचिकेद्वारे कटरनवरे यांनी कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.